Temples
पुणे जिल्ह्यातील एक दुर्लक्षित खजिना : पिंपरी-दुमाल्याचे सोमेश्वर मंदिर
अष्टविनायकांपैकी रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक दरवर्षी येतात. पण रांजणगावपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासाचा एक अनोखा ठेवा दडलेला आहे, याची कल्पना फार कमी लोकांना असते. हे गाव म्हणजे शिरूर तालुक्यातील पिंपरी-दुमाला आणि येथील सोमेश्वर मंदिर.






